‘युतीत शून्य जागा जरी मिळाली तरी मान्य’ गुलाबराव पाटलांचं मोठं विधान…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- भाजपचं लोकसभा मिशन या माध्यमातून बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप युती असणार आहे. यामध्ये युतीचे नेते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील त्यात शून्य जागा जरी आम्हाला लढवावी लागल्या तरी तो मान्य राहील, असे मोठे विधान शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे.
भाजपच्या लोकसभा मिशनवर प्रतिक्रिया देताना त्यांनी हे विधान केले आहे.
काय म्हणाले गुलाबराव पाटील?
‘भाजपाचे मिशन 145 आहे मात्र बाळासाहेबांची शिवसेना व भाजप आमची युती असणार आहे. तेव्हा या युतीमध्ये नेते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. यामध्ये शून्य जागा जरी लढवायला लागल्या तो आम्हाला मान्य राहील फक्त शिंदे साहेबांनी आम्हाला आदेश करावे’ असे गुलाबराव (gulabrao patil) यांनी स्पष्ट केले आहे.
संजय राऊतांवर टीका
भाजपच्या लोकसभा मिश वरून खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीका केली होती. याबद्दल गुलाबराव पाटलांना (gulabrao patil) विचारले असता संजय राऊत यांच्या म्हणण्याला मी भाव देत नाही. कुणीतरी मागच्या दरवाज्याने येणाऱ्या माणसाने हे म्हणावं आणि त्याला आपण मान्यता द्यावी, अशी टीका त्यांनी राऊतांवर केली.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..