अजित पवारांचे पुणेरी चिमटे, मंत्री उदय सामंत यांना जवळ बोलावत म्हणाले…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर :- राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. नेते एकमेकांवर आगपाखड करत आहेत, कोणी कोणावर घोटाळ्याचे आरोप करतंय, तर कोणी कोणाच्या गुन्ह्यांचा पाढा वाचतंय. विधानसभेतलं वातावरण तापलंय. महागाई, बेरोजगारी, रस्ते, कोरोना, सीमाप्रश्न या शब्दांनी जे भवन दणाणलं जायला हवं होतं, तिथं शिळ्या कढीला उत आणला जातोय.
मात्र विरोधी पक्ष नेते अजित पवार यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. अजित पवार कायमच आपल्या आक्रमक, सडेतोड बोलण्यातून ओळखले जातात. ते कायमच विरोधी नेत्यांवर आपल्या आक्रमक शैलीत कोंडीत पकडताना दिसून येतात. परंतु यावेळी त्यांची एक वेगळीच झलक दिसून आली आहे.
भाजप नेते व मंत्री अतुल आणि अजित पवार समोरासमोर आले तेव्हा अजित पवार आपल्या खास अंदाजात अतुल सावे यांना म्हणतात की, “सावे साहेब तुम्ही मंत्री झाल्यापासून तुम्ही इतके बदलला आहात की, मी देवेंद्रजींना अनेकदा सांगतो की, सावे साहेबांना सांगा इतकं तुटक तुटक नसतं राहायचं. त्यानंतर शुक्रवारी अजित पवार कार्यकर्त्यांसोबत फोटो काढत होते.
राज्यभरातून आलेले कार्यकर्ते अजित पवार यांच्यासोबत फोटो काढत होते. त्याचवेळी शिंदे गटाचे नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत त्याठिकाणहून जात होते तेवढ्यात अजित पवार यांनी बोलावून घेतलं.
कार्यकर्त्यांना बाजूला सारत म्हणाले आता आमच्या दोघांचाच फोटो काढा, अजित पवार यांनी उदय सामंत यांच्या खांद्यावर हात टाकून फोटो काढला. त्यानंतर अजित पवार यांनी आपल्या खास शैलीत सामंत यांना म्हणाले आता आता हा फोटो बघून एकनाथराव. आणि तेथे चांगलाच हशा पिकला.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….