नफरत के बाजार में हम मोहब्बत की दुकान खोल रहे है. भारत जोडो यात्रेत राहुल गांधींचं वक्तव्य, आज दिल्लीत लाल किल्ल्यावर धडक…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- माझ्या यात्रेत तुम्हाला कुठेही द्वेष दिसणार नाही. कारण इथे सगळ्या धर्माचे लोक आहेत. माझं कुणाशीही वैर नाही. पण एका विचारधारेविरोधात संघर्ष सुरु आहे.
इथे द्वेषाचा बाजार आहे आणि माझं दुकान प्रेमाचं आहे, असं वक्तव्य काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केलं. भारत जोडो यात्रेने (Bharat Jodo Yatra) आज दिल्लीत प्रवेश केला. आज ही यात्रा लाल किल्ल्यावर (Red Fort) धडकणार आहे.
बदरपूर बॉर्डरवरील सभेत बोलताना राहुल गांधी म्हणाले, कधी कधी त्यांचे नेते विचारतात, राहुल गांधी का चालत आहेत? मी विचार केला आणि उत्तर मिळालं. राहुल गांधींनी सगळ्याच भाजप कार्यकर्त्यांना उत्तर दिलं. आपका बाजार द्वेष का, मेरी दुकान प्रेम की…..
तुम्ही माझा द्वेष करा, मला शिव्या द्या. तुमचा बाजार.. महात्मा गांधी, सरदार पटेल, जवाहरलाल नेहरू, आंबेडकर या सर्वांनी द्वेषाच्या बाजारात प्रेमाचं दुकान उघडलं होतं. त्यामुळे या सगळ्या भाजप नेत्यांना मी आज आवाहन करतो.
तुम्हीदेखील या बाजारात या, आपल्या देशात द्वेषात कुणीही जगू नये…अशी माझी इच्छा आहे, असं वक्तव्य राहुल गांधी यांनी अलवर येथील सभेत केलं. आज भारत जोडो यात्रेने दिल्लीत प्रवेश केला आहे. ही यात्रा आज लाल किल्ल्यावर धडकणार आहे.
दुपारी 4.30 वाजता ही यात्रा लाल किल्ल्यावर दाखल होईल. कोरोनाचा संसर्गावर आळा घालण्यासाठी यात्रेत सहभागी होणारे नेते आणि कार्यकर्त्यांना मास्क घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
हरियाणातील फरीदाबाद येथून एनएचपीसी मेट्रो स्टेशनवरून ही यात्रा सुरु झाली. आजा दुपारी लाल किल्ल्यावर मोठ्या सभेसमोर राहुल गांधींचं भाषण होईल. यानिमित्त वाहतूक पोलिसांनी मोठी तयारी केली आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा 7 डिसेंबरपासून कन्याकुमारी येथून सुरु झाली. ही यात्रा आतापर्यंत 9 राज्यांतून प्रवास करत आज दिल्लीत पोहोचली आहे.
तमिळनाडू, केरळ, कर्नाटक, तेलंगणा, आंध्रे प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान आणि हरियाणा यांचा समावेश आहे. दिल्लीनंतर ही यात्रा पुन्हा एकदा हरियाणात जाईल. ३ जानेवारीनंतर राहुल गांधी पुन्हा हरियाणात जातील.
नव्या वर्षात उत्तर प्रदेश, हरियाणानंतर ही यात्रा पंजाब आणि जम्मू काश्मीरच्या दिशेने रवाना होईल.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….