“आमदारांच्या कपबशा धुण्यासाठी विशेष टॉयलेटची व्यवस्था”, व्हिडीओ ट्वीट करत मिटकरींचे भाजपावर टीकास्त्र; म्हणाले….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपुर :- दोन वर्षानंतर नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन पार पडत आहे. हे अधिवेशन पहिल्या दिवसापासून वेगवेगळ्या मुद्द्यांना गाजलं आहे. सीमाप्रश्न, महाराष्ट्रातील प्रकल्प, भूखंड घोटाळ्यावरून विरोधकांनी दोन्ही सभागृहात शिंदे-भाजपा सरकारला धारेवर धरलं आहे.
त्यातच आता आमदार निवासातील एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी ही व्हिडीओ ट्वीट करत भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे.
‘आझादी का अमृत महोत्सव’ हा हॅशटॅग वापरून अमोल मिटकरींनी एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. त्यामध्ये आमदार निवासातील कपबशी धुण्यासाठी टॉयलेटमधील पाण्याचा वापर करण्यात येत असल्याचा आरोप मिटकरींनी केला आहे. “हे आहे नागपूर हिवाळी अधिवेशनातील आमदार निवासस्थानातील उपहारगृह. हजारो कोटीचे टेंडर कंत्राटदाराला दिल्यानंतर आमदारांच्या कपबशा धुण्यासाठी कंत्रादारांकडून विशेष टॉयलेटची व्यवस्था,” असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे.

यानंतर पत्रकारांशी बोलताना अमोल मिटकरी म्हणाले, “आमदार निवासाचं कोट्यवधी रुपयांचं कंत्राट भाजपाने दिलं आहे. मोजके आमदार त्याठिकाणी राहतात. टॉयलेटमध्ये कपबश्या आणि जेवणाची ताटे धुतले जातात. अजून एक व्हिडीओ आहे, त्यात तिरंगी ध्वजाने इमारती पुसल्या गेल्या आहेत. याबाबत विधानपरिषदेत आवाज उठवणार आहे. १०० कोटी रुपयांचं कंत्राट दिलं असून, ते गेले कुठं,” असा सवाल मिटकरी यांनी उपस्थित केला आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..