गौण खनिजाची वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टरचा अपघात ; मजूर जागीच ठार
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महागाव :
उटी ते महागाव रस्त्याच्या बांधकामावर मुरुम टाकणारे ट्रॅक्टर पलटी झाल्यामुळे ट्रॉलीत बसलेला कामगार दबून जागीच ठार झाला. आज सोमवारी सकाळी हा अपघात झाला. संजय तानाजी मोरे (वय २९) असे मृतकाचे नाव आहे. तो ट्रॅक्टरवर मजूर म्हणून काम करीत होता. उटी ते महागाव रस्त्याचे काम गजानन कंट्रक्शन कंपनी मार्फत करण्यात येत आहे. पंतप्रधान ग्राम सडक योजने अंतर्गत रस्ता तयार करण्यात येत असून ट्रॅक्टर द्वारे रस्त्यावर मुरूम टाकण्यात येत आहे. चालकाने अत्यंत निष्काळजीपणाने वाहन भरधाव चालविल्यामुळे हा अपघात घडला. ट्रॅक्टर पलटी झाल्याने ट्रॉली खाली चेंगरून संजय मोरे याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. याप्रकरणी शामराव तुकाराम गव्हाणे यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी ट्रॅक्टर चालक विजय तानाजी मोरे रा. उटी याचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..