आधी आमदार, मग चिन्ह अन् आता शिवसेनेचं पक्ष कार्यालयही शिंदेगटाच्या ताब्यात….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर :- शिवसेना… या पक्षातील नेत्यांची एकजूट हीच या पक्षाची सर्वात मोठी ताकद असल्याचं बोललं जायचं. शिवसेनेची हीच ताकद जून महिन्यात दोन गटात विभागली गेली.
एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारांसह बंड पुकारलं. त्यानंतर ठाकरेगट आणि शिंदेगट अशा दोन गटात शिवसेना विभागली गेली. त्यानंतर काही दिवसात शिवसेनेचं पक्ष चिन्ह असलेलं धनुष्यबाणही गोठवण्यात आलं.या सगळ्यामोडींनंतर आता शिवसेनेचं पक्ष कार्यालयही शिंदेगटाच्या ताब्यात गेलंय.
शिवसेना कार्यालय शिंदेगटाकडे
सध्या विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. 2019 नंतर पहिल्यांदाच नागपुरात हिवाळी आधिवेशन होतंय. या अधिवेशनावेळी शिवसेनेच्या पक्ष कार्यालयात बदल करण्यात आलेत. शिवसेनेचं पक्ष कार्यालय आता शिंदे गटाच्या ताब्यात देण्यात आलं आहे. आमदारांची संख्या पाहता नागपूर विधिमंडळातील हे कार्यालय शिंदेगटाला देण्यात आलं आहे.
कर्मचारी भावूक
शिवसेनेचं कार्यालय सोडण्याची वेळ आली तेव्हा वर्षानुवर्षे या कार्यालयात काम करत असलेले कर्मचारी भावून झाले.महिला कर्मचाऱ्यांना यावेळी अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. या महिला कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले.
ठाकरे गटाला पर्यायी जागा
शिवसेनेचं पक्ष कार्यालय शिंदेगटाकडे गेलंय. त्यामुळे शिवसेनेच्या ठाकरे गटाला पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..