NCP आमदाराला नक्षलवाद्याची धमकी ; तात्काळ सुरक्षा द्या, अजित पवारांची मागणी…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर :- राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धर्मारावबाबा आत्राम यांना गडचिरोलीतील नक्षलवाद्यांनी धमकी दिली असल्याचा गंभीर मुद्दा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज सभागृहाच्या निदर्शनास आणून दिला.
अजित पवार म्हणाले की, या नक्षलवाद्यांनी थेट प्रेस नोट काढली आहे. गडचिरोली हा आदिवासी जिल्हा असून सुरजागड येथे लोहखनिज प्रकल्प सुरू असून त्यामुळे लोकप्रतिनिधी आणि नक्षल यांच्यामध्ये वाद उफाळून आला आहे. लोकप्रतिनिधींनी विरोध केल्यानंतर ही धमकी देण्यात आली आहे. याची गंभीर दखल घेऊन धर्मारावबाबा आत्राम यांना तात्काळ सुरक्षा द्यावी शिवाय प्रशासनालाही सुरक्षा देण्यात यावी अशी मागणीही अजित पवार यांनी केली. दरम्यान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची दखल सरकारने घेतली आहे आणि तात्काळ सुरक्षा देण्यात येईल असे सभागृहात जाहीर केले.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..