उद्धव ठाकरे ‘बापू’ अन् आदित्य ठाकरे ‘पप्पू’ ; रवी राणांची पुन्हा टीका….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर :- राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन सध्या नागपूर इथं सुरु आहे. या अधिवेशनात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहभागी होणार आहेत. पण यावरुन आमदार रवी राणा यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.
यावेळी उद्धव ठाकरेंचा बापू तर आदित्य ठाकरे यांचा पप्पू असा उल्लेख त्यांनी केला.
उद्धव ठाकरेंचं खऱ्या अर्थानं नाव बापू तर त्यांचा मुलगा पप्पू म्हणजे आदित्य ठाकरे. हे देघेही विदर्भाच्या धरतीवर अधिवेशनात आलेले आहेत. मला त्यांची विनंती आहे की हे अधिवेशन पूर्णपणे चालू द्या. कुठल्याही प्रकारचं राजकारण करु नका. तुम्ही कधी इथं अधिवेशन घेतलं नाही, तुमचे मंत्री कधी इथे आलेले नाहीत. तुम्ही विदर्भात थांबले नाहीत. तुमची अडीच वर्षांची धूळ साफ करणं गरजेची होती, अशा शब्दांत रवी राणा यांनी ठाकरेंवर टीका केली आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे दुपारी नागपूरमध्ये दाखल झाले, ते दोन दिवसांच्या नागपूरच्या दौऱ्यावर असून उद्या ते हिवाळी अधिवेशनात हजेरी लावणार आहेत. उद्धव ठाकरेंचं नागपूरमध्ये आगमन झालं त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. यावेळी त्यांनी हतात ‘खरा वारसदार’ अशा आशयाचे फलक घेऊन घोषणाबाजीही केली.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..