महापुरूषांच्या अवमानाविरोधात मविआचा ‘महामोर्चा’, तर हिंदू देवीदेवतांच्या अपमानाविरोधात सत्ताधाऱ्यांचं ‘माफी मांगो’ आंदोलन….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- मुंबईत आज सत्ताधारी आणि विरोधक रस्त्यावर उतरणार आहेत. महापुरुषांच्या अवमानाच्या निषेधार्थ महाविकास आघाडी ‘महामोर्चा’ काढत आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या भगतसिंग कोश्यारी यांना राज्यपाल पदावरून दूर करण्याची मागणी या आंदोलनात अग्रस्थानी आहे. तर हिंदू देवीदेवतांच्या अपमानाविरोधात सत्ताधाऱ्यांच्या वतीने ‘माफी मांगो’ (Mafi Mango Andolan) आंदोलन करण्यात येतंय.
‘महामोर्चा’
महापुरुषांच्या अवमानाच्या निषेधार्थ महाविकास आघाडी ‘महामोर्चा’ काढत आहे. मुंबईच्या भायखळा इथल्या रिचर्डसन्स अँड क्रूडास कंपनीपासून या महामोर्चाची सुरुवात होईल तर सीएसएमटी स्टेशनच्या समोर टाइम्स ऑफ इंडियाच्या इमारतीच्या इथे हा मोर्चा संपेन. या मोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे. या महामोर्चासाठी सुमारे अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
महामोर्चाला दोन लाख लोक येणार असल्याचं महाविकास आघाडीच्या वतीने सांगण्यात येतंय. सकाळी 9 वाजता महामोर्चाला सुरुवात होणार आहे. भायखळा येथील रिचर्डसन अॅण्ड क्रूडास कंपनीत मोर्चेकरी जमतील. त्यानंतर हा मोर्चा आझाद मैदानाच्या दिशेने निघेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील टाइम्स ऑफ इंडियाच्या इमारतीसमोर या मोर्चाची सांगता होईल. तीन ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. मोर्चेकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे.
‘माफी मांगो’
मविआच्या महामोर्चाला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपे माफी मांगो आंदोलनाची घोषणा केली आहे. हिंदू देवदेवतांचा अपमान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मस्थळाच्या वादावरून भाजपातर्फे मुंबईच्या सहा लोकसभा मतदारसंघात आक्रमक आंदोलन करण्यात येणार आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….