एकनाथ शिंदे नवी टीम तयार करणार ; वाचाळवीरांना मिळणार शिक्षा….?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन होऊन जवळपास सहा महिने लोटले पण तरीही अद्याप मंत्रिमंडळ विस्तार पूर्ण झालेला नाही. यावर्षी तरी हा विस्तार होण्याची चिन्हं दिसत नाही. अशातच आता एकनाथ शिंदे आपली नवी टीम तयार करणार असल्याचेही संकेत त्यांनी दिले आहेत.
शिंदे सरकारचा पहिल्या टप्प्यातला मंत्रिमंडळ विस्तार झाला असून त्यामध्ये १८ मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. त्यातले ९ मंत्री शिंदे गटातले तर ९ भाजपातले आहेत. मात्र उर्वरित विस्तार अजूनही झालेला नाही. हा विस्तार निवडणूक आयोगाचा निर्णय आल्यानंतर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. २० जानेवारीपर्यंत निवडणूक आयोगाचा निर्णय येणार आणि जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती आहे.
मात्र या वेळी मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार आहे. एकनाथ शिंदे यांचं भविष्यासाठी नवी टीम तयार करण्याचं लक्ष्य आहे. त्यामुळे ही संधी देण्यात येणार आहे. तसंच पुन्हा ठाकरे गटात जाण्याची धमकी देणाऱ्या आमदारांना मात्र मंत्रिपद देण्यात येणार नाही. तसंच वाचाळवीरांनाही मंत्रिपदापासून लांबच ठेवण्यात येणार आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..