पोलिस भरतीच्या ऑनलाइन अर्जासाठी या तारखेपर्यंत मुदतवाढ..…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर :- पोलिस अधीक्षक, नाशिक ग्रामीण पोलिस दलाच्या आस्थापनेवर पोलिस शिपाई व पोलिस शिपाईचालक यांची रिक्तपदे भरण्याकरिता जाहिरात देण्यात आलेली आहे. उमेदवारांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत गुरूवारी (ता.१५) पर्यत वाढविण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी दिली.
नव्या मुदतवाढीच्या अनुषंगाने श्री. उमाप यांनी निवेदन प्रसिद्धीस दिले असून त्यानुसार १ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२२ या आर्थिक वर्षातील उत्पन्नाच्या आधारावर नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र असावे. भरतीसाठी अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यत निर्गमित केलेले प्रमाणपत्र वैध राहील.
आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील उमेदवारांनी शासन निर्णयाच्या १२ फेब्रुवारी २०१९ आदेशातील तरतुदीनुसार १ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२२ आर्थिक वर्षातील उत्पन्नाच्या आधारावर विहित करण्यात आलेले मूळ प्रमाणपत्र सादर करावे. त्यासाठी क्रिमिलेअर प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तथापि, प्रमाणपत्र ३० नोव्हेंबर २०२२ पूर्वीचे असणे आवश्यक आहे असेही म्हटले आहे.