“माझ्यावर झालेली शाईफेक हा भ्याडपणा, हिंम्मत असेल तर.”, शाईफेकीच्या घटनेनंतर चंद्रकांत पाटलांची पहिली प्रतिक्रिया….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुणे :- भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध करत, पिंपरी-चिंचवडमध्ये त्यांच्यावर अज्ञात व्यक्तीकडून शाईफेक करण्यात आली आहे.
दरम्यान, या घटनेनंतर चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. माझ्यावर झालेली शाईफेक हा भ्याडपणा असून हिंम्मत असेल तर समोर या, असे आव्हान चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे.
काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
“मी चळवळीतला माणूस आहे. मी कोणाला घाबरत नाही. अशा प्रकारे परचा कावळा करणं, योग्य नाही. मी केलेल्या विधानाचा विपर्यास करण्यात आला आहे. मी त्यावर तीनवेळा स्पष्टीकरणही दिलं आहे. तरीही अशाप्रकारे भ्याडपणे माझ्यावर शाईफेक करण्यात आली आहे. हिंम्मत असेल तर समोर या”, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.
“अशा गोष्टींमुळे आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना तडा देतो आहे. सर्वांना आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे, हे तत्व त्यांनी आयुष्यभर पाळले. मात्र, आता महाराष्ट्रात झुंडशाही सुरू आहे. ही झुंडशाही महाराष्ट्र शासन सहन करणार नाही” , असेही ते म्हणाले.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….