महाराष्ट्रात 11 ते 14 डिसेंबर पर्यंत मुसळधार पावसाचा इशारा ; मंदौस चक्रीवादळाचा परिणाम…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या मंदौस चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात चार दिवस पावसाळी वातावरण तयार होणार आहे.11 ते 14 डिसेंबर या कालावधीत राज्यात मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
कोकण, मध्य महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर राहील.
मंदौस म्हणजे तिजोरी हे नाव संयुक्त अरब राष्ट्राने दिलेले असून, ते 9 डिसेंबर रोजी पाँडेचरी व श्रीहरी कोटा येथील मामल्लापूरमजवळ मध्यरात्री जमिनीवर येणार आहे. याची तीव्रता शुक्रवार ते रविवार (9 ते 11 डिसेंबर) अशी राहील. महाराष्ट्रावर 11 ते 14 डिसेंबरपर्यंत परिणाम राहील. हे चक्रीवादळ गोलाकार फिरत येत असून, वेग ताशी 76 किलोमीटर इतका आहे.
राज्यात ढगाळ वातावरण..
या चक्रीवादळामुळे राज्यात बाष्पयुक्त वारे वेगाने येत असून, ढगाळ वातावरणामुळे किमान तापमानात 2 ते 4 अंशांनी वाढ अपेक्षित आहे. असे वातावरण 15 डिसेंबरपर्यंत राहील. राज्यातील बहुतांश भागात 11 ते 14 डिसेंबरदरम्यान पावसाची शक्यता आहे.
उत्तर महाराष्ट्रात अतिमुसळधार पाऊस शक्य
या चक्रीवादळामुळे उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर जास्त जाणवेल, असा अंदाज आहे. तसेच, कोकण, मध्य महाराष्ट्रात देखील मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाडा, विदर्भात मात्र तुरळक ठिकाणी पाऊस राहील. नाशिकसह उत्तर महाराष्ट्राचा बहुतांश भाग पार करीत मध्य प्रदेश व पुढे छत्तीसगडपर्यंत पावसाचा जोर राहील.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..