गुजरातमधील विजयाच्या आनंदापेक्षा हिमाचलमधला पराभव भाजपच्या जास्त जिव्हारी लागणारा, ही आहेत 4 कारणं….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
शिमला :- गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी 8 वाजतापासून सुरुवात झाली आहे. दोन्ही राज्यांतील कलही समोर आले आहेत. यानुसार, गुजरातमध्ये भाजपला तर हिमाचलमध्ये काँग्रेसला बहुमत मिळत असल्याचं चित्र दिसत आहे.
गुजरातमधील सध्याच्या कलाचे आकडे बघता भाजपसाठी हा ऐतिहासिक विजय ठरू शकतो. मात्र, गुजरातमधील या ऐतिहासिक विजयाच्या आनंदापेक्षाही हिमाचल प्रदेशमधील पराभव भाजपसाठी जास्त जिव्हारी लागणारा असू शकतो. याची काही कारणं जाणून घेऊ. आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार, हिमाचलमधील 68 जागांमध्ये 38 जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे.
4 जागा काँग्रेसने आतापर्यंत जिंकल्या आहेत. भाजप 27 जागांवर आघाडीवर असून 5 जागा जिंकल्या आहेत. तर ३ अपक्ष उमेदवार आघाडीवर असून एक जागा अपक्षाने जिंकली आहे.
हिमाचल प्रदेशात भाजपने गेल्यावेळी 44 जागा मिळवल्या होत्या. तसेच जयराम ठाकूर हा नवीन चेहरा दिला होता. मात्र यावेळी भाजपला बहुमताचा 35 हा आकडा गाठणंही कठीण जाणार असल्याचं चित्र आहे. भाजपच्या पराभवाची कारणं – हिमाचलमध्ये ठाकूर वर्गातील बहुतेक लोकांचा गेल्या निवडणुकीत भाजपला पाठिंबा होता.
यंदा मात्र या वर्गातील लोकांनीही भाजपऐवजी काँग्रेस उमेदवारांना अधिक पसंती दिल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, ठाकूर यांचे वर्चस्व असलेल्या भागातून यंदा भाजपला गेल्या वेळीच्या तुलनेत 5 जागा कमी मिळत आहेत. तर काँग्रेसच्या 4 जागा वाढल्या आहेत.
दलित वर्गातील लोकांनीही गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळी भाजपला कमी पसंती दिल्याचं दिसतं. इथेही आधीच्या तुलनेत आता भाजपच्या ३ जागा कमी झाल्या आहेत.
तर काँग्रेसच्या ३ जागा वाढल्या आहेत.
हिमाचल प्रदेशात सध्या भाजपचं सरकार आहे. हिमाचलमध्ये 1985 नंतर दर पाच वर्षांनी सत्ता बदलते, असा इतिहास आहे. त्यामुळे प्रथेनुसार यावेळीही इथल्या लोकांनी सरकार बदलण्यासच पसंती दिल्याचं दिसत आहे.
2017 च्या निवडणुकीबद्दल बोलायचं झाले तर एकूण 68 विधानसभा जागांपैकी भाजपने 44 जागा जिंकल्या होत्या. तर 21 जागांवर काँग्रेसचा विजय झाला होता. CPI-M ने एक जागा जिंकली होती आणि दोन जागांवर अपक्ष उमेदवार विजयी होते. यावेळी मात्र चित्र अगदी उलटं आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..