दिल्ली महापालिकेत ‘आप’ सुसाट : बहुमताचा आकडा पार….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- दिल्ली महापालिकेच्या (एमसीडी) निवडणुकीची मत मोजणीला आज (दि. ७) सकाळी आठपासून सुरूवात झाली आहे. आतापर्यंत एकूण २५० जागांपैकी १३२ जागा घेऊन आप आघाडीवर आहे.
तर भाजपला १०४ जागांवर आघाडी मिळाली आहे. काँग्रेसने १० जागा जिंकल्या आहेत. तर इतरांना ४ जागा मिळाल्या आहेत. दरम्यान, आपने बहुमताचा आकडा पार केल्याने पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

काँग्रेसचे उमेदवार अरिबा खान यांनी अबुल फजल यांचा पराभव केला आहे. काँग्रेसने जकीर नगरची जागा ताब्यात घेतली आहे. तर भाजपने सरस्वती विहार, पश्चिम विहार आणि राणी बाग या तिन्ही जागा जिंकल्या आहेत. आम आदमी पक्षाचे उमेदवार बॉबी किन्नर यांनी सुलतानपुरी प्रभागातून निवडणूक जिंकली आहे.
आपचे मुख्य प्रवक्ते सौरभ भारद्वाज म्हणाले की, आम्ही १८० हून अधिक जागांवर विजय मिळवू. बहुमताचा आकडा पार केल्याने आपच्या कार्यालयात आनंदाचे वातावरण आहे. कार्यकर्त्यांनी जल्लोषाचे तय़ारी केली आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..