पुण्यात कर्नाटकच्या गाड्यांची सोडली हवा, स्वराज्यचे कन्नडिकांविरोधात आंदोलन…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुणे :- कर्नाटकात महाराष्ट्रातील गाड्यांची तोडफोड केल्याच्या निषेधार्थ पुण्यात खेड शिवापूर टोल नाक्यावर स्वराज्य संघटनेकडून कन्नडिकांविरोधात आंदोलन करण्यात आले.
पुण्यातील खेड शिवापूर टोल नाक्यावर स्वराज्य चे कन्नडिकांविरोधात आंदोलन करत कर्नाटकच्या गाड्यांची हवा सोडण्यात आली.
स्वराज्य संघटनेचे प्रवक्ते डॉक्टर धनंजय जाधव यांनी म्हटलं की, कर्नाटकमध्ये केलेल्या उच्छादाला स्वराज्यचे प्रत्युत्तर आहे.
आज कर्नाटक मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो असणाऱ्या व महाराष्ट्राच्या गाड्यांची तोडफोड केल्याप्रकरणी खेड शिवापूर टोल नाक्यावर स्वराज्य संघटनेच्यावतीने जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले.
कर्नाटकातील वाहनांवर स्वराज्य संघटनेचे स्टिकर लावण्यात आले तसेच गाड्यांवर जय महाराष्ट्र लिहून कन्नडिकांचा निषेध नोंदविण्यात आला.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..