‘स्टेअरिंग माझ्याच हाती’ फडणवीसांनी कार चालवली अन् शेजारी बसले मुख्यमंत्री शिंदे…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर :- राज्याचा कारभार हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच हातात असल्याचा आरोप विरोधक नेहमी करत असतात. पण, आज खुद्द फडणवीस यांनी माझ्याच हातात स्टेअरिंग असल्याचे दाखवून दिलं आहे.
फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज समृद्धी महामार्गाची पाहणी केली यावेळी खुद्द कार ही फडणवीस यांनी चालवली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज समृद्धी महामार्गाचा दौरा करणार आहेत. सकाळीच ते नागपूर येथे पोहोचले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी एकाच कारने शिर्डीकडे रवाना झाले आहे.
फडणवीस यांनी कारची स्टेअरिंग आपल्या हातात घेतली. यावेळी कारमध्ये एकनाथ शिंदे हे शेजारी बसले होते. मर्सिडिज कारमधून दोन्ही नेत्यांनी समृद्धी महामार्गाची पाहणी करणार आहे. नागपूरहून शिर्डीपर्यंत दोन्ही नेते एकत्र प्रवास करत आहे.
दरम्यान, ‘मी आज समृध्दी महामार्गाची पाहणी करणार आहे. 11 डिसेंबरला पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. त्याच्या नियोजनाची तयारीच आढावा घेणार आहे. मला अतिशय आनंद आहे.
राज्यातल्या गेम चेंजर प्रकल्पावर आम्ही काम केलं आहे.
काम सुरू झालं तेव्हा देखील मी या खात्याचा मंत्री होतो आता लोकार्पण होत असताना मुख्यमंत्री आहे याचा मला आनंद आहे. मुंबई नागपुर जवळ येईल, उद्योग वाढलतील. या मार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव दिलं याच समाधान मला आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी नागपूर विमानतळावर बोलताना दिली.

रंगराव काळे यांना विदर्भभूषण पुरस्काराने सन्मानित ; शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल….
Big Breaking ⚡ यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मंडळ बरखास्त प्रशासकाची नियुक्ती
विधान परिषदेसाठी जिल्ह्यातून भाजपाच्या अनेकांची मोर्चेबांधणी ; मदन येरावार, ऍड निलय नाईक, उत्तमराव इंगळे, नितीन भुतडा गजानन महाराज माऊली महाकाली देवस्थान कासोळा यासह अनेकांचे नेत्यांना साकडे….
वर्ग ७ वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ व बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न….
हाजी रफीक अहेमद लोहार नगर परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळा क्रं २ पुसद येथे सामाजिक अंकेक्षण निरीक्षण ; ग्राम व जिल्हा साधन व्यक्तींची भेट….
माळपठार भागातील रस्त्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाला पुसद काँग्रेसचे “अल्टीमेटम”