हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शरद पवारांच्या नेतृत्त्वात मोर्चा…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- हिवाळी अधिवेशन पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या नेतृत्त्वात विधानभवनावर मोर्चा काढण्यात येणार आहे. एक लाखावर कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचे सांगितले. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी अधिवेशन पहिल्या दिवसापासूनच वादळी होण्याचे स्पष्ट संकेत दिले.
१९ डिसेंबरपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. राज्यातील एकूण स्थिती बघता अधिवेशन चांगलेच गाजणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मोर्चाच्या तयारीसंदर्भात आढावा घेण्यासाठी प्रदेशाध्यक्ष दिलीप वळसे पाटील आज नागपुरात आहेत. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या, वाढती बेरोजगारी, परराज्यात जात असलेले प्रकल्प, शेतकरी आत्महत्या या संवेदनशील मुद्द्यांवर सरकारला जाब विचारण्यासाठी राज्यभरातून एक लाख कार्यकर्ते येणार असल्याचे वळसे पाटील यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल भाजप नेत्यांच्या वक्तव्याची वक्तव्ये जाणीवपूर्वक महाराष्ट्राचा अपमान करण्यासाठी केली जात आहे काय, हे तपासून बघण्याची गरज आहे. उद्धव ठाकरे यांनी काल महिला मुख्यमंत्रीपदाबाबत सूतोवाच केले होते, त्यानुसार सुप्रिया सुळे मुख्यमंत्रिपदाच्या दावेदार आहे काय, या प्रश्नाला त्यांनी काहीही चर्चा करता येणार नाही, असे नमूद केले.