महापुरुषांची बदनामी करून काय मिळवणार…? ; राज ठाकरे यांनी भाजप-काँग्रेसला ठणकावले…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- सुसंस्कृत महाराष्ट्रातील राजकारणाचा दर्जा खालावत असून महिला नेत्यांवर खालच्या पातळीवर टीका, जाती-पातीचे विष कालवले जात आहे. देश पातळीवरही राष्ट्रपुरुषांची सुरू असलेली बदनामी भाजप-काँग्रेसने त्वरित थांबवावी, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी येथे केले.
मशिदीवरील भोंग्यांविरोधातील आंदोलन पुन्हा सुरू करण्याचे आणि आरे ला कारे ने चोख उत्तर देण्याचे आदेशही त्यांनी या वेळी मनसैनिकांना दिले.
गोरेगाव येथे गटाध्यक्षांच्या मेळाव्यात ठाकरे बोलत होते. कलुषित वातावरणामुळे उद्योग, मुले-मुली देशाबाहेर जात असून आपण महाराष्ट्र कुठे घेऊन चाललो आहोत याचे भान राज्यातील नेत्यांनी ठेवावे, असे ठणकावून सांगत राज यांनी या वेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनाही खडसावले.
गुजराती- मारवाडींचा पुळका घेणाऱ्या राज्यपालांनी आधी ही मंडळी व्यवसायासाठी राज्यात का आली याचा विचार करावा, केवळ राज्यपाल आहात म्हणून मान राखतोय.. राज्यात शिव्यांची कमतरता नाही, असा इशाराही त्यांनी दिला. राज्यातून उद्योग जात असून केंद्र सरकारनेही केवळ गुजरात गुजरात न करता अन्य राज्यांकडेही समान वृत्तीने पाहावे. सगळय़ाच राज्यांचा विकास झाला पाहिजे; पण देशातील कलुषित वातावरणामुळे पाच लाख उद्योजक देशाबाहेर गेल्याचा दावाही त्यांनी या वेळी केला. सावरकरांनी इंग्रजांची माफी मागितल्याचे सांगत काँग्रेस नेते राहुल गांधी सावरकरांची बदनामी करीत आहेत. मात्र कारागृहातून सुटून पुन्हा स्वातंत्र्यासाठी लढण्यासाठीची सावरकरांची ती रणनीती होती. चांगल्या कामासाठी खोटे बोलले तरी त्यात गैर नाही हीच कृष्णनीती असल्याचा दावा करीत देशातील महापुरुषांची बदनामी थांबविण्याचे आवाहन त्यांनी केले.

Big Breaking ⚡ यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मंडळ बरखास्त प्रशासकाची नियुक्ती
विधान परिषदेसाठी जिल्ह्यातून भाजपाच्या अनेकांची मोर्चेबांधणी ; मदन येरावार, ऍड निलय नाईक, उत्तमराव इंगळे, नितीन भुतडा गजानन महाराज माऊली महाकाली देवस्थान कासोळा यासह अनेकांचे नेत्यांना साकडे….
वर्ग ७ वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ व बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न….
हाजी रफीक अहेमद लोहार नगर परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळा क्रं २ पुसद येथे सामाजिक अंकेक्षण निरीक्षण ; ग्राम व जिल्हा साधन व्यक्तींची भेट….
माळपठार भागातील रस्त्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाला पुसद काँग्रेसचे “अल्टीमेटम”
बारामतीमधून काँग्रेसची माघार, विजय वडेट्टीवार यांनी स्पष्टच सांगितले, ‘आमच्या वरिष्ठांशी…’