हर्षवर्धन पाटील व तिघांविरोधात अटक वॉरंट ; दिल्लीचे पोलिस इंदापुरात, तालुक्यात खळबळ…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
इंदापूर :- सन २०१९ मध्ये सैनिक इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने दिल्लीतील न्यायालयात दाखल केलेल्या दाव्याच्या सुनावणीस हजर न राहिल्यामुळे दिल्ली येथील न्यायालयाने कर्मयोगी सहकारी साखर कारखाना, कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील व इतर तिघांविरुद्ध अटक वॉरंट जारी केल्यानंतर दिल्लीतील पोलिस पथक शुक्रवारी (दि.२५) रात्री इंदापुरात दाखल झाले. आज दिवसभर ते इंदापुरातच असल्याने खळबळ उडाली आहे.
विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याने दिलेला धनादेश न वटल्याने सैनिक इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने दावा दाखल केला होता. त्या दाव्याच्या सुनावणीला हजर न राहिल्यामुळे हे अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. दि.२ डिसेंबरला न्यायालयात हजर राहावे, अन्यथा या सर्वांना फरार घोषित करण्यात येणार आहे. हे अटक वॉरंट घेऊन दिल्लीचे पोलिस पथक शुक्रवारी रात्री इंदापुरात आले. आज दुपारपर्यंत ते इंदापूर पोलिस ठाण्यात होते. त्यांच्यामध्ये बऱ्याच वेळ खलबते झाली. त्यानंतर हे पथक कर्मयोगी कारखान्याच्या कार्यक्षेत्राकडे गेल्याचे बोलले जात होते.
या प्रकरणाबाबत पत्रकारांनी बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी, इंदापूरचे पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक यांच्याशी संपर्क साधला होता. मात्र, काहीच माहिती मिळाली नाही. कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

Big Breaking ⚡ यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मंडळ बरखास्त प्रशासकाची नियुक्ती
विधान परिषदेसाठी जिल्ह्यातून भाजपाच्या अनेकांची मोर्चेबांधणी ; मदन येरावार, ऍड निलय नाईक, उत्तमराव इंगळे, नितीन भुतडा गजानन महाराज माऊली महाकाली देवस्थान कासोळा यासह अनेकांचे नेत्यांना साकडे….
वर्ग ७ वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ व बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न….
हाजी रफीक अहेमद लोहार नगर परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळा क्रं २ पुसद येथे सामाजिक अंकेक्षण निरीक्षण ; ग्राम व जिल्हा साधन व्यक्तींची भेट….
माळपठार भागातील रस्त्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाला पुसद काँग्रेसचे “अल्टीमेटम”
बारामतीमधून काँग्रेसची माघार, विजय वडेट्टीवार यांनी स्पष्टच सांगितले, ‘आमच्या वरिष्ठांशी…’