‘ते’बोलतात वेगळे, लोक वेगळे समजतात; अमृता फडणवीस यांच्याकडून राज्यपालांचे समर्थन…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे मराठी माणसांवर, मराठी भाषेवर खूप प्रेम आहे. अनेकदा बोलताना ते वेगळे बोलत असतात, परंतु लोक वेगळे समजतात, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी कोश्यारी यांच्या विधानाचे समर्थन केले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे कोश्यारी अडचणीत आले आहेत.
पतंजली योगपीठ आणि मुंबई महिला पतंजली योग समितीच्या वतीने शुक्रवारी योग विज्ञान शिबिर व महिला संमेलनाचे आयोजन ठाण्यात करण्यात आले होते. या संमेलनास अमृता फडणवीस उपस्थित होत्या. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना कोश्यारी यांच्या वक्तव्याबद्दल प्रश्न विचारला. त्यावेळी अमृता म्हणाल्या की, महाराष्ट्रात आल्यावर मराठी शिकलेले ते एकमेव राज्यपाल आहेत. अनेकदा बोलताना ते वेगळे बोलतात, परंतु लोक ते वेगळेच समजतात. श्रद्धा वालकर हिला न्याय मिळाला पाहिजे असे त्या म्हणाल्या.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..