उद्धव ठाकरेंवर टीका करताना शिंदे गटाच्या खासदाराची जीभ घसरली ; म्हणाले की…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 40 शिवसेना आणि 10 अपक्ष आमदारांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडत बंडखोरी केली. बंडखोरीनंतर आज शिंदे आपल्या आमदारांसह पुन्हा गुवाहाटीला जाणार आहेत.
अजूनही शिंदे आणि ठाकरे गटातील नेते टीका करत असून शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी ठाकरे गटातील नेत्यांवर निशाणा साधला आहे. “उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये मूर्खांचा बाजार भरला आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटात सर्व उपरे लोक भरले आहेत. त्यामुळे चांगली लोकं हळूहळू दूर जातील, असा टोला खासदार प्रतापराव जाधव यांनी लगावला आहे.
प्रतापराव जाधव यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या गटात सध्या गोंधळ सुरु आहे. ज्या ठिकाणी मुर्खांचा बाजार भरतो, त्या ठिकाणी गोंधळ झाल्याशिवाय राहत नाही. आता तिथे सर्व उपरे लोक भरले आहेत.
नुकताच जाधव यांनी एक दावाही केला होता. ते म्हणाले होते की, ठाकरे गटातील उरलेल्या 15 आमदारांपैकी आठ आमदार शिंदे गटात येतील. यासोबतच ठाकरे गटातील उर्वरित पाचपैकी तीन खासदारही शिंदेंसोबत येतील. अजूनही ठाकरे गटातील खासदार आणि आमदार आमच्या संपर्कात आहेत. पण त्यांच्या स्थानिक पातळीवरील काही वैयक्तिक अडचणी आहेत, असे जाधव यांनी म्हंटले होते.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..