ठाणे, मुंब्र्यात राष्ट्रवादी आक्रमक; बाजारपेठ, रिक्षा बंदमुळे नागरिकांचे हाल…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
ठाणे :- भाजपच्या महिला पदाधिकाऱ्याच्या तक्रारीवरून आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा पोलिसांनी दाखल केल्यानंतर ठाणे, मुंब्य्रात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले.
सोमवारी सकाळी मुंब्रा पोलिस ठाण्याबाहेर घोषणाबाजी, ठिय्या आंदोलन करून कार्यकर्त्यांनी विवियाना मॉल तसेच बायपास मार्ग, ठाणे-पुणे महामार्गावर जळलेले टायर टाकून वाहतूक बंद करण्याचा प्रयत्न केला. आव्हाड समर्थकांनी दुकाने, रिक्षा बंद केल्यामुळे नागरिकांचीही गैरसोय झाली.
आव्हाड यांच्यावर कलम ३५४ अंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल होताच, त्यांच्या पत्नी ऋता आव्हाड पतीच्या बचावासाठी मैदानात उतरल्या. आव्हाड यांच्या आमदारकीचा बळी देण्यासाठीच हे कारस्थान रचले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच आव्हाड यांच्यावर लावण्यात आलेल्या गुन्ह्यांविरोधात आवाज उठवणार असून, त्यांच्यावरील आरोप सिद्ध झाले नाही तर आम्ही पोलिसांविरोधात न्यायालयात जाणार असल्याचा इशाराही दिला आहे.
‘तो व्हिडीओ शहरभर दाखवणार’
गर्दीच्या ठिकाणी अशा प्रकारे होणारे स्पर्श विनयभंग आहे का? असेल तर अशा ठिकाणी जायचेच कशाला असा प्रश्न ऋता आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. इतकेच नव्हे तर नेमके काय घडले, हे जनतेला कळायला हवे म्हणून भाजपच्या महिला पदाधिकाऱ्याने सादर केलेला व्हिडीओ आपण स्वतः मोठे स्क्रीन लावून शहरभर दाखवणार असल्याचे त्या म्हणाल्या.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….