भारत जोडो यात्रेत माविआचं शक्तिप्रदर्शन; दिल्लीवरुन येणार सोनिया गांधी तर पवार-ठाकरे ही राहणार हजर….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
वाशिम :- कॉंग्रेस नेते तथा खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रा मराठवाड्यातून आज (मंगळवारी ता. १५ नोव्हेंबर) सकाळी ६.३० वाजता विदर्भात दाखल झाली आहे. पैनगंगा नदी ओलांडून ही यात्रा वाशीम जिल्ह्यात प्रवेश केला आहे.
यावेळी वैनगंगा नदीच्या पुलावर वाशीम जिल्हा काँग्रेस कमिटीकडून या यात्रेचे, तसेच राहुल गांधी यांचे जंगी स्वागत करण्यात आले आहे.
आज शेगावात होणाऱ्या राहुल गांधी यांच्या जाहीर सभेला काँग्रेस नेत्या सोनिया गांधी उपस्थित राहण्याचे संकेत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहेत. यात्रेच्या पार्श्वभूमीवर काल नाना पटोले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. विशेष म्हणजे काँग्रेसने शेगावच्या सभेसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही निमंत्रण देण्यात आलं आहे.
काँग्रेसच्या विनंतीनुसार शरद पवार आणि उद्धव ठाकरे शेगावच्या सभेला हजर राहिले तर भारतीय जनता पक्षाला विरोध करणाऱ्या देशातील सर्व मोठ्या पक्षांची मांदियाळी एकाच मंचावर पाहायला मिळणार आहे. महाविकास आघाडी स्थापनेला जवळपास तीन वर्ष झाली आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर सरकार पडलं तरीही महाविकास आघाडीत एकजूट दिसून येत आहे. अजूनही तिन्ही पक्षांनी एकमेकांची साथ सोडली नाही. अशावेळी महाविकास आघाडीचे प्रमुख शिल्पकार सभेला हजर झाले तर भाजपसाठी तो खूप मोठा धक्का असेल.