ज्ञानवापी मशिदीच्या प्रकरणावर तोडगा निघणार का….?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
वाराणसी :- ज्ञानवापी (Gyanvapi Case) मशिदीच्या परिसरात मुस्लिमांच्या प्रवेशावर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या याचिकेच्या वैधतेवर वाराणसी न्यायालय (Varanasi Court) आज निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. काशी विश्वनाथ (Kashi Vishveshwar Temple) मंदिराशेजारील मशिदीवरून याआधीही अनेकदा कायदेशीर वाद झाले आहेत. गेल्या वर्षी ५ महिला याचिकाकर्त्यांनी मशिदीच्या बाहेरील भितींवर आणि इतर जुन्या मंदिराच्या परिसरात दिसणाऱ्या आणि अदृश्य देवतांच्या समोर दैनंदिन प्रार्थना करण्याची परवानगी मागितली होती. हा परिसर आता वर्षातून एकदा हिंदू भाविकांना प्रार्थना करण्यासाठी खुला आहे.
वाराणसीच्या जिल्हा न्यायाधीशांच्या न्यायालयात मुख्य प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. तसेच जलदगती न्यायालय याच मुद्द्यावरच्या वेगळ्या याचिकेवर सुनावणी करत आहे. मुस्लिमांच्या प्रवेशावर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या याचिकेच्या वैधतेवर आज निर्णय जाहीर होणार असल्याचे जलदगती न्यायालयाने सांगितले होते. याशिवाय विश्व वैदिक सनातन संघाच्या याचिकेतही हा परिसर हिंदूंच्या ताब्यात द्यावा आणि शिवलिंगाची पूजा करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आलेली आहे.
या मशिदीमध्ये सापडलेल्या ‘शिवलिंगा’चा काळ कार्बन डेटिंग पद्धतीने शोधण्याची मागणी वाराणसी जिल्हा न्यायालयाने गेल्या महिन्यात फेटाळली होती. मशिदीच्या भिंतीनजीक असलेल्या हिंदू देवतांच्या मूर्त्यांची तसेच शृंगारदेवी मंदिरात दररोज पूजा करण्याची परवानगी द्यावी, यासाठी हिंदू पक्षाकडून न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार झालेल्या सर्वेक्षणात मशिदीच्या वझुखान्याजवळ सापडलेली वस्तू प्राचीन शिवलिंग असल्याचा हिंदू पक्षकारांचा दावा असून हे केवळ कारंजे असल्याचे मशीद व्यवस्थापनाचे म्हणणे आहे.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….