भाजपने चित्रा वाघ यांना दिली मोठी जबाबदारी ; चंद्रशेखर बावनकुळेंनी केली घोषणा…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्या खांद्यावर भाजपने आता मोठी जबाबदारी दिली आहे.
भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी चित्रा वाघ यांची नियुक्ती केली आहे. आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी वाघ यांना नियुक्तीचे पत्र दिले आहे. वाघ या नेहमी विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर देत असतात. तसेच त्यांनी महिलांसाठी राज्यभर काम केले आहे.
भाजपमध्ये प्रवेश करण्याअगोदर चित्रा वाघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होत्या. २०१९ च्या विधानसभा निवडणुकांअगोदर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. वाघ नेहमी चर्चेत असतात.
आज चंद्रशेखर बावनकुळे यांनी नियुक्तीचे पत्र दिले आहे. ” आपली भारतीय जनता पार्टी, महिला मोर्चाच्या ‘प्रदेश अध्यक्ष’ पदी नियुक्ती करण्यात येत आहे. आपले मन:पूर्वक अभिनंदन. आपण आपल्या संघटन कौशल्याने राज्यभरात भाजपा च्या महिला मोर्चाचे संघटन वाढवण्यासाठी अथक परिश्रम कराल, ही अपेक्षा आहे, असं या पत्रात म्हटले आहे.
भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या नियुक्तीनंतर भाजपने पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांना डावलले असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.