लोकसभेसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीचे गड टार्गेटवर….! भाजपचा 45 जागांवर डोळा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आतापासूनच कंबर कसून तयारी सुरू केली. भाजपच्या मिशन 45 चा आढावा घेण्यासाठी आज दुपारी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह लोकसभा निवडणुकीची जबाबदारी असलेल्या सर्व मंत्री आणि पदाधिकाऱ्यांसोबतची बैठक आज पार पडली.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपकडून मिशन 45 अभियानाला सुरवात झालीय. या अभियानाचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक भाजपने बोलवली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत आज दुपारी एक वाजता भाजप प्रदेश कार्यालयात बैठक झाली. महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून किमान 45 जागा जिंकण्याचे ध्येय भाजपने समोर ठेवले आहे.
दरम्यान भाजप प्रामुख्याने राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडे असलेले मतदारसंघ असलेल्या ठिकाणांवर लक्ष केंद्रित करणार आहेत. या मतदारसंघातील तयारीचा आढावा आणि येणाऱ्या काळातल्या योजना यासाठी उद्या विभागीय संघटन मंत्री लोकसभा प्रवासाची जबाबदारी असलेले प्रमुख नेते यांची बैठक होईल.