शिंदे गटाच्या मंत्र्याचे मोठे वक्तव्य ; अशोक चव्हाण लवकरच……?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पक्षातून इनकमिंग आणि आऊटगोइंग सुरू झालं. हे इनकमिंग आणि आऊटगोइंग अजूनही सुरूच आहे. मग ते शिवसेनेचे आणि उद्धव ठाकरे यांचे विश्वासू मिलिंद नार्वेकर असो किंवा राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे असोत किंवा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण असोत यांच्या दुसऱ्या पक्षात जाण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगताना दिसत आहेत.
अशातच गेल्या काही दिवसांपासून माजी मंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र अशोक चव्हाण यांनी या फक्त अफवा असल्याचा खुलासा केला होता. मात्र आता शिंदे गटाचे नेते आणि कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी मोठं विधान केलंय. अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार असल्याची कुजबुज सुरु असून, चव्हाण यांचे समर्थक असलेल्या आमदारानेच आपल्याला ही माहिती दिली असल्याचंही अब्दुल सत्तार म्हणालेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाली आहे.
औरंगाबादमध्ये पत्रकार परिषदेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेबद्दल पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यावर बोलतांना सत्तार म्हणाले , अशोक चव्हाण यांचे समर्थक आमदार राजूरकर यांच्याकडे मी याबाबत विचारणा केली होती. त्यावेळी चव्हाण भाजप प्रवेशाची कुजबूज सुरू असल्याचा राजूरकर यांनीच मला सांगितले असल्याचं सत्तार म्हणाले.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….