काँग्रेस आमदाराकडून राहुल गांधींची तुलना प्रभू श्रीरामाशी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- देशात सध्या राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेची चर्चा आहे. भाजपकडून ठिकठिकाणी या यात्रेवर टीकास्र सोडलं जातंय. काँग्रेसकडूनही सडेसोड प्रतिक्रिया येत आहेत. एका काँग्रेस आमदाराने राहुल गांधी यांची तुलना थेट प्रभू श्रीरामाशी केली आहे.
मध्य प्रदेश सरकारमध्ये कृषीमंत्री असलेले भाजप नेते यांनी भारत जोडो यात्रेला लक्ष्य करीत, अगोदर काँग्रेसने स्वतःला जोडावं; असं म्हटलं होतं. कृषी मंत्र्यांच्या या विधानावर काँग्रेस नेते तथा आमदार कुणाल चौधरी यांनी राहुल गांधींची तुलना प्रभू श्रीरामांशी केली आहे.
”ज्याप्रमाणे प्रभू श्रीरामांनी वनवास काळात उपेक्षित, शोषित आणि वंचितांना जोडण्याचं काम केलं, त्याप्रमाणेच राहुल गांधी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून उपेक्षित, शोषित आणि वंचितांना एकत्र करण्याचं काम करीत आहेत.” असं कुणाल चौधरी म्हणाले.

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा मध्य प्रदेशच्या दिशेने जात आहे. यात्रा जसजशी पुढे सरकतेय तसतसं राजकीय वातावरण तापू लागलं आहे. यात्रेवरुन आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. भाजप नेते आणि कृषीमंत्री कमल पटेल यांनी शनिवारी खंडवा येथे एक बोलतांना, राहुल गांधी यांनी अगोदर काँग्रेस जोडायला पाहिजे. कारण काँग्रेसचे आमदारच पक्ष सोडून जात आहेत. त्यामुळे अशा भारत जोडो यात्रेला काही अर्थ नाही, असं विधान पटेल यांनी केलं होतं. त्यांना काँग्रेस नेते कुणाल चौधरी यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.
दरम्यान, यापूर्वी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही राहुल गांधींची तुलना श्रीरामांशी केली होती.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….