आरोग्य विभागात १० हजार पदांची भरती ; गिरीश महाजन यांची घोषणा……
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्यात आरोग्य विभागात लवकरच १० हजार पदांची भरती करणार असल्याची घोषणा राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे. येत्या १ जानेवारी ते ७ जानेवारी दरम्यान जाहिरात निघणार असल्याचं त्यांनी म्हटलं.
याबाबत महाजन म्हणाले की, मार्च २०१८ मध्ये आरोग्य विभागात १३ हजार जागांची भरती निघाली होती. मात्र मधल्या काळात याकडे दुर्लक्ष झालं. आता आम्ही १० हजार १२७ जागा भरणार आहोत. त्यासाठीचं वेळापत्रक निश्चित केले आहे.
फेब्रुवारी-मार्च दरम्यान आम्ही या परीक्षा घेणार आहोत. २७ मार्च ते २७ एप्रिलपर्यंत आम्ही सर्व जागा भरून नियुक्तीपत्रक देणार असल्याचं महाजन यांनी स्पष्ट केलं. ते पुढं म्हणाले की, १ जानेवारी ते ७ जानेवारी दरम्यान जाहिरात प्रसिद्ध होईल. त्यानंतर महिनाभरात तांत्रिक अडचणी दूर केल्या जातील. तर २५ जानेवारी ते ३० जानेवारी या काळात अर्जांची छाननी होईल. त्यानंतर ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान पात्र उमेदावारांची यादी जाहीर करणार आहोत. त्यानंतर २५ ते २६ मार्च दरम्यान परीक्षा होतील.
दरम्यान २७ मार्च ते २७ एप्रिल या कालावधीत निकाल जाहीर करून उमेदवारांची नियुक्ती आम्ही करणार आहोत, असंही महाजन यांनी स्पष्ट केलं.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….