दिवाळी घरी की तुरुंगात…? अनिल देशमुखांच्या जामिनावर आज CBI न्यायालयाचा फैसला….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सीबीआय (CBI) प्रकरणातील जामीनावर कोर्ट आज निर्णय देणार आहे.
मुंबई सत्र न्यायालयातील (Mumbai Sessions Court) विशेष सीबीआय कोर्टाकडून आज दुपारपर्यंत निकाल येईल. देशमुख यांच्या जामीनावरील दोन्ही बाजूंचा युक्तिवाद काल पूर्ण झाला आहे. हायकोर्टानं दिलेल्या निर्देशानंतर अनिल देशमुख यांचा पासपोर्ट काल मुंबई सत्र न्यायालयात जमा करण्यात आला आहे. 100 कोटींच्या कथित वसुलीप्रकरणी अनिल देशमुख 11 महिने तुरुंगात आहेत. दरम्यान, अनिल देशमुखांची दिवाळी घरी की जेलमध्ये होणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.
ईडीनं नोंदवलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणात 4 ऑक्टोबरला मुंबई उच्च न्यायालयातून जामीन मिळाल्यानंतर देशमुख यांनीही या प्रकरणात जामिनासाठी अर्ज केला होता. कथित भ्रष्टाचार आणि पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर मुंबईतील विशेष न्यायालयानं गुरुवारी (20 ऑक्टोबर) शुक्रवारी निर्णय सुनावला. सीबीआय या प्रकरणाचा तपास करत आहे. ईडीनं नोंदवलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणात 4 ऑक्टोबर रोजी मुंबई उच्च न्यायालयातून जामीन मिळाल्यानंतर 71 वर्षीय देशमुख यांनीही या प्रकरणात जामिनासाठी अर्ज केला होता.
2021 मध्ये अनिल देशमुख यांना झाली होती अटक
अनिल देशमुख यांच्या खटल्यात विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश एस.एच. ग्वालानी यांनी जामीन अर्जावरील दोन्ही पक्षांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर निकाल राखून ठेवला आहे. अनिल देशमुखांना 2 नोव्हेंबर 2021 रोजी अटक करण्यात आली होती आणि सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. देशमुख यांना गेल्या आठवड्यात ‘कोरोनरी अँजिओग्राफी’साठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. देशमुख महाविकास आघाडी (MVA) सरकारमध्ये गृहमंत्री होते.
अनिल देशमुख सध्या मुंबईतील आर्थर रोड कारागृहात आहेत. मार्च 2021 मध्ये, IPS अधिकारी परमबीर सिंह यांनी आरोप केला की, तत्कालीन गृहमंत्री देशमुख यांनी मुंबईतील रेस्टॉरंट आणि बारमधून दरमहा 100 कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश दिले होते. या आपरो-प्रत्यारोपांच्या सत्रानंतर अनिल देशमुखांना अटक करण्यात आली होती.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी त्यावेळचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर दरमहा 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे आदेश दिल्याचा आरोप केला होता. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर या प्रकरणी सीबीआयनं प्राथमिक चौकशीनंतर अनिल देशमुखांसह अन्य काहीजणांच्या विरोधात गुन्हा नोंदवला होता. आता या प्रकरणाची सुनावणी मुंबई सत्र न्यायालयात सुरु आहे.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….