शिवसैनिक आक्रमक; मातोश्रीबाहेर 50 खोके एकदम ओक्केच्या घोषणा……
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- मातोश्रीबाहेर शिवसैनिकांची जोरदार घोषणाबाजी सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. बुलडाण्यातून उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवसैनिक मातोश्रीवर दाखल झाले आहेत.
आज या शिवसैनिकांची उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक आहे. त्यापूर्वी बुलडाण्यातून मातोश्रीवर दाखल झालेल्या शिवसैनिकांनी मातोश्रीबाहेर शिंदे गटाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. 50 खोके एकदम ओक्केच्या घोषणा या शिवसैनिकांकडून देण्यात आल्या. शिवसैनिक शिंदे गटाविरोधात आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले.
आज उद्धव ठाकरेंसोबत बैठक
आज बुलडाण्यातील शिवसैनिकांची उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक आहे. या बैठकीसाठी शिवसैनिक मातोश्रीवर दाखल झाले आहेत. मातोश्रीवर दाखल झाल्यानंतर शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. 50 खोके एकदम ओक्के अशा घोषणा शिवसैनिकांकडून देण्यात आल्या. जूनमध्ये अनेक आमदार फुटले, जुलैमध्ये खासदार फुटले मात्र जिल्ह्यात शिवसैनिकांचं संघटनात्मक पातळीवर कार्य सुरू आहे. अनेक दिवसांपासून उद्धव ठाकरे यांना भेटण्याची इच्छा होती. आज ही भेट होत असल्याची प्रतिक्रिया मातोश्रीवर आलेल्या शिवसैनिकांनी दिली.
भाजप, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा ठाकरे गटात प्रवेश
आज बुलडाणा जिल्ह्यातील भाजप, राष्ट्रवादी आणि वंचित बहूजन आघाडीचे अनेक कार्यकर्ते ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. त्यासाठी हे कार्यकर्ते मातोश्रीवर दाखल झाले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये हे कार्यकर्ते हाती शिवबंध बांधणार आहेत. हा बुलडाणा भाजपसाठी मोठा धक्का माणण्यात येत आहे. एकीकडे ठाकरे गटातून बाहेर पडून पदाधिकारी, नगरसेवक हे भाजप आणि शिंदे गटात प्रवेश करत आहेत. मात्र दुसरीकडे बुलडाण्यातील अनेक भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे आज ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….