केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं, 6 जणांचा मृत्यू….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
केदारनाथ :- केदारनाथ येथे हेलीकॉप्टर कोसळल्याची दुर्घटना घडली. या अपघातामध्ये ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मदतकार्यासाठी पथके रवाना झाली आहेत. केदारनाथमध्ये दाट धुके असल्याचे सांगण्यात येत आहे.
त्यामुळे हेलिकॉप्टरचा अपघात झाला असा अंदाज बांधण्यात येत आहे.
गुप्तकाशीहून जेव्हा हे हेलिकॉप्टर केदार घाटीकडे निघाले तेव्हा ते गरुडचट्टी येथे कोसळले. हेलिकॉप्टरमध्ये ६ जण होते असे सांगण्यात येत आहे. मात्र, अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. हे हेलिकॉप्टर खासगी कंपनीचं असल्याचं सांगण्यात येत आहे. हेलिकॉप्टर संदर्भात अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून सुरु आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 21-22 ऑक्टोबर रोजी केदारनाथ आणि बद्रीनाथला भेट देणार असताना ही घटना घडली आहे.

2019 मध्येही केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळले होतं. प्रवाशांना केदारनाथहून फाटा इथे घेऊन जात असताना हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने वैमानिकाला इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं आणि यादरम्यान हेलिकॉप्टरचा अपघात झाला होता. लँडिंग करताना हेलिकॉप्टरचा मागील भाग जमिनीवर आदळल्याने हा अपघात झाला होता. सुदैवाने हेलिकॉप्टरच्या वैमानिकासह सहा प्रवाशांना कोणतीही इजा झालेली नव्हती.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….