ओला दुष्काळ जाहीर करा ; शेतकऱ्यांचे अर्धनग्न होत बोंब मारो आंदोलन….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
परभणी :- ओला दुष्काळ जाहीर करा, पीकविमा देण्यात यावा, या मागण्यांसाठी पाथरी तहसील कार्यालयासमोर मागील चार दिवसांपासून शेतकरी उपोषणाला बसले आहेत.
आज दुपारी आक्रमक होत आंदोलकांनी अर्धनग्न होत प्रशासना विरोधात बोंबाबोंब आंदोलन केले.
मागील काही दिवसांपासून तालुक्यात जोरदार पाऊस पडत आहे. चार ही मंडळातील खरीप पिके पूर्णपणे हातची गेली आहेत. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करावा, पीकविमा तत्काळ देण्यात यावा या प्रमुख मागण्यांसाठी तालुक्यातील शेतकरी चार दिवसांपासून तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत. आंदोलनात दिवसेंदिवस शेतकऱ्यांचा सहभाग वाढत आहे. दोन दिवसांपूर्वी आंदोलक आणि पालकमंत्री तानाजी सावंत यांचे दूरध्वनीवरून संभाषण झाले होते. त्यांनी प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन देत उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मात्र, प्रशासन दखल घेत नसल्याने आंदोलकानी आज दुपारी अर्धनग्न होत बोंब मारो आंदोलन करत लक्ष वेधले.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….