शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका ; उपचारासाठी मुंबईला हलवलं…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
औरंगाबाद :- शिंटे गटातील आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका आल्याची मोठी बातमी समोर आली आहे. संजय शिरसाट यांना उपचारासाठी मुंबईला रवाना करण्यात आले आहे
काल सायंकाळी त्यांच्या छातीत दुखत असल्यानं औरंगाबाद शहरातील सिग्मा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.त्यानंतर आज सकाळी पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईला रवाना करण्यात आले आहे. एअर अंबुलन्स ने संजय शिरसाट मुंबईला रवाना करण्यात आल आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे.
स्वस्थ वाटत असल्याने काल दुपारी त्यांना औरंगाबादच्या सिग्मा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर 24 तासांच्या आतच शिरसाट यांना औरंगाबादहून मुंबईतल्या रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.
संजय शिरसाट यांना औरंगाबाद विमानतळावर जेव्हा आणण्यात तेव्हा त्यांच्या कार्यकर्त्यांनी लगबगही पाहायला मिळाली. औरंगाबादेतील सिग्मा रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना मुंबईला उपचारासाठी नेण्यात यावं, अशा सूचना केल्या होत्या. त्यानंतर त्यांना एअर एम्ब्युलन्सने मुंबईला रवाना करण्यात आले आहे.
शिवसेनेचे उमेदवार म्हणून शिरसाट सलग तीन वेळेस विधानसभा निवडणुकीत विजयी झाले आहेत. राज्यात झालेल्या सत्तांतरात शिरसाट देखील सामील होते. शिंदे-फडणवीस यांच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या सरकारमध्ये त्यांचा समावेश होईल अशी अटकळ बांधली जात होती. मात्र, त्यांना मंत्रिपदाची संधी न मिळाल्याने ते नाराज असल्याची चर्चा सुरु होती.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….