‘या, बसा आणि वाचा’ उपक्रमाला वाचकांचा उस्फूर्त प्रतिसाद ; डॉ. कलाम फोरमचे आयोजन…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुरुषोत्तम कुडवे
दिग्रस :- डॉ. एपीजे अब्दुल कलाम फोरम दिग्रसच्या वतीने रिडींग मॅरेथॉन अंर्तगत ‘या, बसा आणि वाचा!” उपक्रम राबविण्यात आला. डॉ कलाम जयंती अर्थातच वाचन प्रेरणा दिनानिमित्त कलामांना पुस्तक वाचून आदरांजली वाहण्याचा हा सामूहिक प्रयत्न कौतुकाचा विषय ठरला आहे.
माजी राष्ट्रपती, मिसाईल मॅन, भारतरत्न डॉ एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केल्या जातो. यवतमाळचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी या निमित्ताने जिल्ह्यात रिडींग मॅरेथॉन आयोजित करण्याची सूचना केली होती. त्यानुसार येथील डॉ कलाम फोरमने ‘वाचा आणि कळवा’ अभियान राबविले. या अभियानांतर्गत नागरिकांना पुस्तक वाचण्यासाठी येथील नगर परिषद कन्या शाळेत आणि डॉ कलाम स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेत वाचकांसाठी व्यवस्था करण्यात आली होती.
ब्रेन ट्रस्ट कोचिंग क्लासेसचे संचालक सचिन कोरडे यांच्या हस्ते डॉ. कलाम यांच्या प्रतिमेला मालार्पण करून वाचन उपक्रमास सुरवात करण्यात आली. यावेळी सदानंद आठवले, मनोरमा इसाळकर, विजय कांबळे, धन्नू मस्के, अशोक कायंदे, सैय्यद गफ्फार, आसिफ शेख उपस्थित होते.
या वाचन आदरांजली सोहळ्यात शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला, अधिकारी, कर्मचारी, व्यावसायिक मोठ्या संख्येत उस्फूर्तपणे सहभागी झाले होते. डॉ. कलाम फोरमचे सदस्य मिर्जा नासिर बेग व फैय्याज शेख यांनी उपक्रमाचे व्यवस्थापन केले तर सर्व सदस्यांनी उपक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

कलामांच्या भव्य प्रतिमेचे अनावरण
स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौकात डॉ एपीजे अब्दुल कलामांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी डॉ कलामांच्या भव्य प्रतिमेचे अनावरण तहसीलदार प्रवीण धानोरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगर परिषद मुख्याधिकारी सुधाकर राठोड, ठाणेदार धर्मराज सोनुने, गट शिक्षणाधिकारी मुकेश कोंडावार, जिल्हा नियोजन समिती सदस्य सुधीर देशमुख, सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष पुरुषोत्तम कुडवे,प्रा. प्रवीण चांडक, प्रा. डॉ. संजय देवस्थळे, अंजुमन शिक्षण संस्थेचे सचिव हाजी सज्जू पहेलवान, प्रा. मतीन खान, केंद्र प्रमुख किरण बारशे, गोदावरी बँकेचे राहुल कोल्हे, दिलीप महिपाल, सचिन डाके व नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते. ही प्रतिमा डॉ. कलाम फोरमला प्रियंका मेमोरियल फाउंडेशनचे सदानंद आठवले यांनी भेट दिली आहे.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….