ठाकरे गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव, तर शिंदे गट आता ‘बाळासाहेबांची शिवसेना’ ; शिंदे गटाला नव्याने तीन चिन्हं द्यायचे निर्देश….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- उद्धव ठाकरे गटाला ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव तर मशाल हे चिन्ह मिळालं आहे.
तर शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळालं आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांच्य वतीनं आज निवडणूक आयोगामध्ये चिन्ह आणि नावासाठी कागदपत्र जमा केली होती. त्यावर निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे.
दोन्ही गटांच्या नावातील दुसरा पर्याय केंद्रीय निवडणूक आयोगाने मान्य केले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव देण्यात आलं आहे. तर त्यांना ‘मशाल’ हे चिन्ह देण्यात आलं आहे. तसेच शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव देण्यात आलं आहे.
उद्धव ठाकरे यांनी त्रिशूल या चिन्हाची मागणी केली होती. हे धार्मिक चिन्ह असल्याने हे देता येत नाही. तसेच उगवता सूर्य हे तामिळनाडूतील पक्षाचं चिन्ह असल्याने हे चिन्ह देता येणार नाही असं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं. त्यामुळे तिसरा पर्याय म्हणून मशाल हे चिन्ह देण्यात आलं आहे.
शिंदे गटाला नव्याने तीन चिन्हं द्यायचे निर्देश
शिंदे गटाने उगवता सूर्य, त्रिशूळ आणि गदा या चिन्हांचा पर्याय देण्यात आला होता. पहिल्या दोन चिन्हांबाबत निवडणूक आयोगाने आधीच भूमिका स्पष्ट केली. तर गदा हे चिन्ह धार्मिक चिन्ह असल्याने ते देता येणार नाही असं सांगत शिंदे गटाने तीन नव्या चिन्हांचा पर्याय द्यावा असं सांगितलं आहे.
पहिल्याच राजकीय डावपेचामध्ये उद्धव ठाकरे जिंकल्याचं शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी म्हटलं. यामध्ये बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि शिवसेना या तिन्ही नावांचा समावेश आहे असंही ते म्हणाले.
शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गोठवल्यानंतर दोन्ही गटांनी आपल्या चिन्हांचा आणि नावाचा पर्याय देण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले होते. त्यानंतर दोन्ही गटांनी पक्षांच्या तीन नावाची आणि तीन चिन्हांच्या पर्यायाची नावं दिली होती. त्यावर निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….