ईद-ए-मिलाद दिनानिमित्त राष्ट्रीय रक्तदानात 151 दात्यांचे रक्तदान ; गोदावरी बँक व डॉ.कलाम फोरमचे आयोजन…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुरुषोत्तम कुडवे ९३७०४६४८२४
दिग्रस :- राष्ट्रीय रक्तदाता दिनाच्या निमित्ताने ईद-ए-मिलादच्या पावन पर्वावर आयोजित रक्तदान शिबिरात विक्रमी 151 दात्यांनी रक्तदान केले. डॉ एपीजे अब्दुल कलाम फोरम आणि गोदावरी अर्बन मल्टी स्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोयायटी लि. नांदेड शाखा दिग्रसच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ईद निमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्याचे डॉ कलाम फोरमचे हे दुसरे वर्ष होते.
दिग्रस शहर आणि परिसरातील तरुण मोठ्या संख्येत रक्तदानासाठी उपस्थित होते. उपविभागीय पोलिस अधिकारी आदित्य मिरखेलकर, व्हीसीएचे अंपायर ऍड दिनेश पवार, उपप्राचार्य शरीफ शेख, मुख्याध्यापक निवृत्ती ढोडरे, शाखाव्यवस्थापक राहुल कोल्हे पाटील, सौ. रश्मी मनोज टेवरे, ऍड. समीर खान, ऍड. राहील खान यांचेसह सर्व जाती धर्मिय व्यक्तींनी रक्तदानात उस्फूर्तपणे सहभाग नोंदवला.
पालकमंत्री ना. संजय राठोड, शिक्षणाधिकारी प्रमोद सूर्यवंशी, तहसीलदार प्रवीण धानोरकर, माजी नगराध्यक्ष श्याम पाटील, जिल्हा नियोजन समिती सदस्य सुधीर देशमुख, माजी जि प सदस्य विष्णू उकंडे, माजी नप सभापती सैय्यद अक्रम, डॉ मनोज टेवरे, डॉ. प्रदीप मेहता, डॉ मिलिंद दुधे, डॉ अभय गोविंदवार, केमिस्ट संघटनेचे सुनिल हरसूलकर, सागर पडगीलवार, इद्रिस डोसानी, आसिफ नागाणी, कबड्डीपटू श्रीचंद राठोड, क्रीडा प्रशिक्षक सुरेश शर्मा, कारी निजामोद्दीन, विस्तार अधिकारी शुभदा पाटील, मुख्याध्यापक शंकर भगत, केंद्र प्रमुख किरण बारशे, प्रा. सुधीर पाठक, प्रा. राजेश वानखडे, प्रा. प्रवीण चांडक, प्रा. जोगिया, गजानन गोटे, साहेबराव हटवार, सुदर्शन हसबे, एल पी राठोड, संजय ढोले, सैय्यद गफ्फार, इनर व्हील क्लबच्या उज्वला मानकर, शाहीन यास्मिन डोसानी, पत्रकार रामदास पद्मावार, सुरेंद्र मिश्रा, अभय इंगळे, साजीद पतलेवाले, किशोर कांबळे, विष्णू यादव, फारूक अहेमद, रफिक शेख, जुबेर खान, जय राठोड, अनिल राठोड, सैय्यद शोएब, अजीस शेख, अमीन कलरवाले, सदानंद आठवले, अमित देशमुख, गोपाल शहा, यशवंत सुर्वे पाटील, ऍड अमोल अलोने, पंकज देशमुख, तुपटाकळी येथील दिलीप गावंडे, अच्यूत कावलकर, पुंडलिक ठाकरे यांनी शिबिराला भेट देऊन डॉ कलाम फोरम आणि गोदावरी बँकेच्या या सामाजिक कार्याचे कौतुक केले.
शिबिराच्या आयोजनात कलाम फोरमचे आमीन नवरंगाबादे, फिरोज खान, आमीन चौहान व संपूर्ण सदस्य तथा गोदावरी बँकेचे अधिकारी सुयोग महल्ले, हर्षल बदूकले, सलमान शेख व सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. रक्त संकलनासाठी यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉ. श्रद्धा चौधरी, अमर इमले यांचेसह चमू उपस्थित होती.
यांनी केले रक्तदान :-
एसडीपीओ आदित्य मिरखेलकर, ऍड दिनेश पवार, शाखा व्यवस्थापक राहुल कोल्हे, मुख्याध्यापक निवृत्ती ढोडरे, शिक्षक के राजू, पापिनी नरेश, महेश अंदूरे, अविनाश गलाट, अमित वानखडे, बँक कर्मचारी संदीप कापसे, अमोल बोंडगे, अजय मांजरे, सौ. रश्मी मनोज टेवरे, राजकुमार राठोड, विजय कांबळे, रुपेश अरगडे, प्रमोद इंगोले, अमित शाह, प्रवीण शिवरमवार, तेजस काप्रतवार, आदित्य शिंदे, सचिन गुजर, सचिन श्रीचंद राठोड, राजेश लाखकर, दुर्गादास चव्हाण, संकेत बाकनोर यांचेसह 151 दात्यांनी रक्तदान केले.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….