भारत जोडो यात्रेला एक महिना पूर्ण,आज ३१ वा दिवस…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- कॉंग्रेसच्या भारत जोडो यात्रेला आज एक महिना पूर्ण होत आहे. आज यात्रेचा ३१ वा दिवस आहे. आज शनिवारी कर्नाटकातील तुमकुरु येथील मायासांद्रा येथून यात्रेला सुरुवात झाली.
राहुल गांधी भारत जोडो यात्रेचे नेतृत्व करत आहेत. त्यांच्यासोबत काग्रेसचे हजारो कार्यकर्ते यात्रेत सहभागी झाले आहेत. दोन दिवसापूर्वी कर्नाटकात काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधीही सहभागी झाल्या होत्या.
काँग्रेसच्या ट्विटर अकाऊंटवरुन भारत जोडो यात्रेचा व्हिडिओ शेअर केला आहे. यात सोनिया गांधी यात्रेत सहभागी झाल्याचे दिसत आहे. “भारत जोडो यात्रेला आईचा आशीर्वाद, जनतेचा पाठिंबा मिळत आहे. आम्ही देशवासियांना वचन देतो की ही यात्रा परस्पर सौहार्द, बंधुभाव वाढवण्याबरोबरच ज्वलंत मुद्दे मांडेल,अशी कॅप्शन दिली आहे.

शुक्रवारी या यात्रेत कर्नाटकातील अनेक मोठे नेते सहभागी झाले. यात दिवंगत पत्रकार गौरी लंकेश यांच्या आई आणि बहिणी सहभागी झाले होते.यावेळी गौरी लंकेश यांच्या आई इंदिरा लंकेश आणि त्यांची बहीण कविता लंकेश राहुल गांधींसोबत पायी चालताना दिसल्या.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….