“.तेव्हा राज ठाकरेंना शिव्या घालण्याचे आदेश ‘मातोश्री’वरुन आले”; शिंदे गटातील खासदाराचा खळबळजनक आरोप….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मेळाव्यामधून लोकसभेमधील शिवसेनेचे गटनेते राहुल शेवाळे यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
आपल्या भाषणामध्ये शेवाळे यांनी वडील चोरले या आरोपाला उत्तर दिलं आहे. या भाषणामध्ये शेवाळेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपाचे विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना सोडली त्यावेळेस ‘मातोश्री’वरुन आलेल्या आदेशांबद्दल खळबळजनक दावा केला आहे.
आदित्य ठाकरेंनी केलेल्या खोके घेतल्याच्या आरोपांवरुन उत्तर देताना शेवाळे यांनी, “याच युवराजांना आम्ही सांगू इच्छितो की, छगन भुजबळ शिवसेना सोडून गेले तेव्हा आम्ही सर्वजण शिवसेनेच्या पाठिशी उभे राहिलो. त्यावेळी युवराजांनी आपल्या वडिलांना विचारायला हवं होतं की किती खोके आम्हाला त्यावेळी दिले,” असं म्हटलं. तसेच पुढे बोलताना शेवाळे यांनी राज यांनी शिवसेना सोडली तेव्हा आम्हाला मातोश्रीवरुन राज यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा आणि त्यांना शिव्या घालण्याचे आदेश देण्यात आल्याचा उल्लेख केला.
“२००५ मध्ये राज ठाकरे शिवसेना सोडून गेले तेव्हाही आम्ही आम्ही शिवसेनेला साथ दिली. शिवसेनाप्रमुखांना साध दिली. तेव्हा किती खोकी दिली याचाही आम्हाला हिशोब मिळायला पाहिजे. तेव्हा तर आम्हाला असे आदेश होते की, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या घरावर मोर्चा काढा. कार्यालयावर मोर्चे काढा, त्यांना शिव्या घाला, त्यांच्यावर आरोप करा, असे आरोप आम्हाला ‘मातोश्री’वरून वारंवार येत होते,” असं शेवाळे म्हणाले.
तसेच शेवाळे यांनी नारायण राणेंच्या घरावर हल्ला करण्यासाठी ‘मातोश्री’वरुन आदेश आल्याचाही दावा केला. “नारायण राणे शिवसेना सोडून गेले तेव्हाही आम्हाला असेच आदेश यायचे की, चेंबुरचे कार्यालय फोडा. माझी पत्नी इथं उपस्थित आहे. माझ्या पहिल्या मुलाचा जन्म झाला तेव्हा मी रुग्णालयात होतो. त्याचा फक्त चेहरा बघितला आणि लगेच साहेबांचा ‘मातोश्री’वरुन आदेश आला की, कणकवलीला जा आणि नारायण राणेंविरोधात सभा घ्या. लगेच आम्ही बॅग भरून त्या सभेला गेलेलो. आयुष्यातील एवढे महत्त्वाचे क्षण आम्ही संघटनेला दिले. शिवसेनाप्रमुखांच्या विचारांसाठी दिले. त्या क्षणांची किंमत कधीच खोक्यात होऊ शकत नाही,” असं भावनिक विधान शेवाळेंनी केलं.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….