दसरा मेळाव्यात जाणाऱ्या कार्यकर्त्यांचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू ; श्रीकृष्ण मांजरे होते मंत्री संजय राठोड यांचे खंदे समर्थक…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुरुषोत्तम कुडवे ९३७०४६४८२४
दिग्रस :- दिग्रस तालुक्यातील हरसूल येथील मृतक श्रीकृष्ण मांजरे हे शिंदे गटाचे मंत्री संजय राठोड यांचे खंदे समर्थक होते. शिंदे गटाचे मंत्री संजय राठोड यांच्या वतीने ते दसरा मेळाव्यात सहभागी होण्यासाठी प्रवासात भिवंडी येथे त्यांना अचानक चक्कर येऊन पडले तेव्हा त्यांना ठाणे रुग्णालयात दाखल केले. असता त्यांचा मृत्यू हृदय झटक्याने झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी वर्तविला आहे.

त्यांचे शवविच्छेदन झाले असून अंत्यसंस्कार हरसूल येथेच होणार असल्याचे त्यांचा मोठा मुलगा गोपाल मांजरे यांनी सांगितले. श्रीकृष्णा मांजरे, वय ६० वर्षे. हरसूल ता. दिग्रस जि. यवतमाळ येथील निष्ठावंत शिवसैनिक होते. गावातील प्रत्येक सार्वजनिक कार्यक्रमात त्यांचा सहभाग असायचा. दिग्रस आणि परिसरात होणाऱ्या शिवसेनेच्या प्रत्येक कार्यक्रमाला त्यांची आवर्जून हजेरी असायची. संजय राठोड यांचे खंदे समर्थक म्हणूनही त्यांना ओळखले जायचे. शिवसेनेचा भगवा शेला नेहमी त्यांच्या खांद्यावर असायचा. शेती, शेत मजूरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह ते चालवायचे. त्यांच्या मागे पत्नी, ३ मुले आणि एक विवाहित मुलगी, नातवंड, सुना असा मोठा परिवार आहे. कालच दुर्गोत्सवात त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यांच्या अशा अचानक जाण्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….