शरद पवार उद्धव ठाकरेंसोबत, शिंदे गटाविरोधात उतरले निवडणुकीच्या मैदानात…!
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुणे :- शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर शिंदे गटाने भाजपसोबत सरकार स्थापन केले. आता अंधेरी पूर्वमध्ये पहिली पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना आणि शिंदे गटामध्ये लढत होणार आहे.
या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे. अंधेरी पूर्व मतदारसंघामध्ये शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचं निधन झालं आहे. त्यामुळे या मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक होत आहे. येत्या 3 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.
तर 6 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीसाठी शरद पवार यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. अंधेरी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे.शिवसेनेनं आपला उमेदवार जाहीर केला आहे. या उमेदवाराला राष्ट्रवादी पाठिंबा देणार आहे, अशी घोषणाच शरद पवारांनी केली.
तसंच, ‘राज्यात दसरा मेळाव्याहून जे सुरू आहे ते दुर्दैवी आहे. एका पक्षाचे दोन भाग झाले आहेत.
पण त्यामुळे राज्यातल्या राजकीय वातावरण बिघडणार नाही. याची खबरदारी प्रमुख नेत्यांनी घ्यायला हवी, आमच्यासारख्या वरिष्ठ मंडळीनाही सांगावं. आता दसरा मेळाव्याला ज्या भूमिका मांडतील त्याने कटुता वाढणार नाही हे पहा’, असा सल्लाही शरद पवारांनी शिंदे गट आणि शिवसेनेला दिला. एकनाथ शिंदे हे काँग्रेस नेत्याकडे प्रस्ताव घेऊन गेले होते, 2014 ला शिवसेनेसोबतच्या सरकार स्थापन करण्याचा काँग्रेसचा कुठलाही प्रस्ताव असता तर मला समजलं असतं.
अशोक चव्हाण काही बोललल्याचं मला तरी माहिती नाही, असंही पवार म्हणाले.
‘दसरा मेळावा हा शिवसेनेचा आहे, तो वेगळा पक्ष आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेना दसरा मेळावा घेत आहे.राष्ट्रवादी त्यात काही करणार नाही’, असंही पवारांनी स्पष्ट केलं. ‘मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं अशी मागणी आहे त्यांवर राष्ट्रवादीची भूमिका काय आहे? असं पत्रकारांनी विचारलं असता पवार म्हणाले की, ‘आम्ही कधीही अशी मागणी केलेली नाही, निर्णय राज्य सरकारने घ्यावा’ असं पवार म्हणाले.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….