ओबीसीतून आरक्षण मागणीसाठी सकल मराठा समाजाचा मोर्चा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
बीड :- मराठा समाजाला ओबीसीतून ५० टक्क्यांच्या आतील आरक्षण द्यावे, या प्रमुख मागणीसाठी सोमवारी जिल्ह्यातील दुसऱ्या टप्प्यातील पहिला मोर्चा शहरात निघाला. (Maratha Reservation) एक मराठा लाख मराठा, तुमचे आमचे नाते काय जय भवानी जय शिवराय, कोण म्हणतं देत नाही, घेतल्या शिवाय राहत नाही, अशा घोषणांनी शहर दणानून गेले.
प्रचंड सहभागासह मोठ्या घोषणा, हाती भगवे ध्वज असा शिस्तबद्ध मोर्चा निघाला. (Marathwada) मराठा आरक्षणासाठी २०१६ मध्ये राज्यभर मराठा क्रांती मोर्चातर्फे मुक मोर्चे निघाले. त्यात (Beed) बीड जिल्ह्यातील मोर्चा राज्यात लक्षवेधी ठरला होता. त्यानंतर सरकारने दिलेले आरक्षण न्यायालयात टिकले नाही.
त्यामुळे आता समाजाला ओबीसीतून ५० टक्क्यांच्या आत आरक्षण देण्याची मागणी पुढे आली आहे. कळंब (जि. उस्मानाबाद) येथे नुकताच या मागणीसाठी मोर्चा निघाला होता. त्यानंतर शिरुर कासारमध्ये सकल मराठा समाजाने पुढाकार घेऊन मोर्चाची घोषणा केली. कमी कालावधीतही मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळाला.
शहरातील संभाजी चौकात राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जिजाऊला शिववंदना देण्यात आली. त्यानंतर मराठा आरक्षण मोर्चाला सुरुवात झाली. ढोल ताशांचा गजराज वाजत गाजत मोर्चा तहसील कार्यालया समोरील मैदानावर पोचला.
यावेळी सभेत विद्यार्थ्यांनी मागण्यांचा उहापोह केला. समाजास कुणबी मराठा ५० टक्के आरक्षण ओबीसीमधुन देण्यात यावे, आरक्षण मिळेपर्यंत शासकीय नोकर भरती बंद ठेवण्यात यावी, कोपर्डी हत्याकांडातील आरोपींना फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करावी आदी मागण्यांचे निवेदन तहसिलदार श्रीराम बेंडे यांना देण्यात आले. मोर्चात जिल्ह्याह राज्यभरातून समाजबांधव सहभागी झाले.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….