परिक्षार्थ्यांनो, सज्ज व्हा..! ; MPSC २०२३ चं वेळापत्रक जाहीर….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्य सरकारमध्ये नोकरीसाठी दरवर्षी परीक्षा घेतली जाते. या परीक्षेसाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने विद्यार्थी तयारी करत असतात. याच विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे.
२०२३ साली MPSC कडून घेण्यात येणाऱ्या परिक्षांचं अंदाजित वेळापत्रक जाहीर झालं आहे.

MPSC च्या २०२३ या वर्षांत होणाऱ्या परिक्षांचं अंदाजित वेळापत्रक जाहीर झालं आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ट्वीट करत याविषयीची माहिती दिली आहे. या परीक्षांचं सविस्तर वेळापत्रक विद्यार्थ्यांना https://mpsc.gov.in/ या साईटवर जाऊन पाहता येणार आहे.
राज्यसेवा मुख्य परीक्षा ३० सप्टेंबर, १ ऑक्टोबर, ७ ऑक्टोबर, ८ ऑक्टोबर आणि ९ ऑक्टोबर या ४ दिवशी होणार आहे. तसंच याचा निकाल अंदाजे जानेवारी २०२४ मध्ये लागेल. याशिवाय अराजपत्रित गट ब, गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ च्या अंतर्गत १० पदांसाठी जानेवारी २०२३ मध्ये जाहीरात निघेल. ३० एप्रिल रोजी परीक्षा पार पडेल.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…