मराठा समाज पेटून उठला तर खाजवायला जागा राहणार नाही…! ; विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा इशारा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी मराठा समाजाबाबत केलेल्या अवमानकारक विधानाचा निषेध आहे. मराठा समाज व इतर कोणत्याही समाजाचा अवमान करणे चुकीचे आहे. मराठा समाज पेटून उठला ना तर तुझ्याकडे खाजवायला एक जागा सुद्धा शिल्लक राहणार नाही, असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिला.
जुन्नर येथील शासकीय विश्रामगृहात शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. यावेळी ते बोलत होते. माजी आमदार बाळासाहेब दांगट, उपजिल्हा प्रमुख संभाजी तांबे, तालुकाप्रमुख माऊली खंडागळे, विधानसभा संपर्कप्रमुख दिलीप बामणे, बाळासाहेब पाटे, योगेश पाटे, बाळासाहेब पाटे, राम गावडे, सुनील मेहेर, जयवंत घोडके, दिलीप डुंबरे, रशीद इनामदार, चंद्रकांत डोके यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा अंबादास दानवे यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, मराठा समाज सातत्याने आरक्षणाची मागणी करत आहे. आता तुमचे सरकार आले आहे. मराठय़ांना तुम्ही आरक्षण दिले पाहिजे. मराठा समाज व इतर कोणत्याही समाजाचा अवमान करणे चुकीचे आहे. मराठा समाज पेटून उठला ना तर तुझ्याकडे खाजवायला एक जागा सुद्धा शिल्लक राहणार नाही, असा इशाराही दानवे यांनी यावेळी सावंत यांना दिला.
सत्तेसाठी कोल्हे, कुत्रे, लांडगे एकत्र आलेत
‘सत्तेसाठी कोल्हे, कुत्रे, लांडगे एकत्र आले आहेत. शिवसेनेतील धनदांडगे गेले, मात्र सर्वसामान्य शिवसैनिक जागेवरच आहे. आत्मविश्वासाने संघटनात्मक काम करा. लढण्याचा निर्धार करा. आगामी निवडणुकीत क्रांती होईल, असा विश्वास व्यक्त करत अंबादास दानवे म्हणाले, मंत्री अब्दुल सत्तार म्हणतात, मी कुत्रा निशाणी घेऊन निवडणूक लढवली तरी निवडून येईल. लोक म्हणतात या कुत्र्याला मतदान करायचं का? कुत्रा तरी प्रामाणिक असतो, अशी जळजळीत टीकाही दानवे यांनी यावेळी केली.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…