भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने शहीद भगतसिंग यांची 115 वी जयंती साजरी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- स्थानिक सुभाष वार्ड येथे शहीद भगतसिंग यांच्या 115 वी जयंती आदरांजली देऊन साजरी करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे जेष्ठ नेते कॉ सुरेंद्र गडदे हे होते.
यावेळी भारतात समाजवाद प्रस्थापित व्हावा अशी इच्छा भगतसिंग यांची होती असे प्रतिपादन भगतसिंग यांच्या जीवनावर विचार व्यक्त करताना कॉ सुरेंद्र गडदे यांनी सांगितले. तसेच या कार्यक्रमाच्या निमित्ताने पक्षाच्या व जनसंघटनांच्या संदर्भात चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. गावपातळीवर संघटनांनी काम करावी व समाजातील तळागाळातील वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा असे सुध्दा ते यावेळी म्हणाले.
या कार्यक्रमाला भाकप तालुका सचिव कॉ अमोल गवरशेट्टीवार, एआयवायएफ जिल्हासचिव निखिल टोपलेवार, एआयवायएफ तालुकाध्यक्ष समाधान बळी, डॉ खुर्शीद वजुद, साहेबराव राऊत, हमाल माथाडी संघटनेचे संतोष ठामकेदार हे प्रामुख्याने उपस्थित होते.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…