मिस्टर गुवाहाटी …काही तरी सोडा आमच्यासाठी; पालकमंत्री जाहीर झाल्यानंतर अंतर्गत नाराजीचा सूर….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या तब्बल दीड महिन्यांनंतर पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली.
शिवसेनेचे प्राबल्य असलेल्या जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदी शिंदे गटाच्या मंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र ठाणे जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांचा घोषनेनंतर भाजप माजी नगरसेवकाने नाराजी व्यक्त केली आहे.
रस्त्याच्या कामावरून मंत्री रविंद्र चव्हाण आणि शिंदे गटातील वाद समोर आला होता. त्यानंतर आता ठाणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरुन नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर भाजपच्या माजी नगरसेवकाने फेसबुकवर पोस्ट करत बोचरी टीका केली आहे.
मुख्यमंत्र्यांना मिस्टर गुवाहाटी म्हणत भूमिपुत्रांसाठी काही तरी सोडा अशी फेसबुक पोस्ट भाजपचे माजी नगरसेवक मंदार तावरे यांनी केली आहे. “व्हा रे… व्हा मिस्टर गुवाहाटी आम्हाला पालकमंत्री पण दिलात तो घाटी… काय तरी सोडा इथल्या भूमीपुत्रांच्या हाती… नाहीतर परत लढावा लागणार आमच्या अस्मितेसाठी…,” अशी पोस्ट मंदार तावरे यांनी केली आहे.

दरम्यान, कल्याण डोंबिवली शहरातील रस्त्यावरून मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं होतं . त्यानंतर शिंदे गटाकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं. त्यानंतर सोशल मीडियावर हा वाद सुरू झाला तो आजतागायत थांबलेला नाही.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…