अमरावतीत आमदार संतोष बांगर यांच्या ताफ्यावर शिवसैनिकांकडून हल्ला….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
अमरावती :- अमरावतीत आमदार संतोष बांगर यांच्या ताफ्यावर शिवसैनिकांकडून हल्ला करण्यात आला आहे. ‘पन्नास खोके , एकदम ओके’ अशा घोषणा सुद्धा शिवसैनिकांकडून यावेळी देण्यात आल्या.
दरम्यान, अमरावतीच्या अंजनगाव सुर्जीमधील ही घटना आहे.
शिंदे गटाने बंडखोर करत भाजपबरोबर सरकार स्थापन केले. त्यापूर्वी शिवसेनेचे ३९ आमदार नॉट रिचेबल होते. सुरुवातील आमदार सुरत, गुवाहटी, गोवा नंतर मुंबईत असा प्रवास करत शिंदे फडणवीस सरकार आले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले. यानंतर शिंदे गट व शिवसैनिक अनेक वेळा आमनेसामने आले आहेत. तसेच दोघांमध्ये वाद, भांडण हाणामारी सुद्धा झाली आहे. आज पुन्हा एकदा शिंदे गटातील आमदार संतोष बांगर यांच्या ताफ्यावर शिवसैनिकांनी हल्ला केला आहे.
दरम्यान, अमरावतील आमदार संतोष बांगर यांच्या ताफ्यावर शिवसैनिकांकडून हल्ला करण्यात आला आहे. ‘पन्नास खोके.एकदम ओके’ अशा घोषणा सुद्धा शिवसैनिकांकडून यावेळी देण्यात आल्या. दरम्यान, अमरावतीच्या अंजनगाव सुर्जीमधील ही घटना आहे. संतोष बांगर गाडीतून जात असताना शिवसैनिकांनी गाडी थांबवली व बांगर यांच्या वाहनावर हातांनी मारत त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी बांगर गाडीतून न उतरता पुढे गेल्याने अनर्थ टळला.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…