मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसले श्रीकांत शिंदे ; शिवसेनेकडून फोटो ट्विट….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे बसून कामकाज हाताळत असल्याचा एक फोटो व्हायरल होत आहे. शिवसेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी हा फोटो ट्विट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.

‘महाराष्ट्र राज्याला सुसंस्कृत राजकीय इतिहास आहे व मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीला देखील तितकाच आहे. आदित्य ठाकरे हे मंत्री म्हणून कामकाज सांभाळत असल्याची यांना अडचण होती. पण स्वतःचे पुत्र आमदार किंवा मंत्री नसताना मुख्यमंत्रीपदाचा अनादर करत असल्याची त्यांना काहीच हरकत नाही!’ असे प्रियांका चतुर्वेदी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
चतुर्वेदी यांनी ट्विट केलेल्या फोटोत श्रीकांत शिंदे एका कार्यालयात बसलेले दिसतात. ते ज्या खुर्चीत बसले आहेत त्यामागे महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री असे लिहिलेले दिसते. शिंदे यांच्या समोर काही लोकही दिसत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनीही हा फोटो ट्विटवर शेअर केला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की ‘खा. श्रीकांत शिंदे यांना सुपर सीएम झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा. मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत त्यांचे चिरंजीव मुख्यमंत्री पदाचा कारभार सांभाळतात. लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सुरूय. हा कोणता राजधर्म आहे? असा कसा हा धर्मवीर?’. त्यांनी हे ट्विट एकनाथ शिंदे यांना टॅग केले आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…