खासदार राणांविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट काढण्यात आले आहे. जात प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून मुंबईतील कोर्टाने हे वॉरंट काढले असून शाळा सोडल्यच्या खोट्या दाखल्यावरून जातीचा दाखला मिळवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
त्याचबरोबर नवनीत यांच्यासोबत त्यांच्या वडिलांच्या विरोधातही हे वॉरंट काढण्यात आले आहे.
अनुसूचित जातीच्या प्रमाणपत्रासाठी त्यांनी एका बोगस शाळा सोडल्याच्या दाखल्याचा वापर केला होता. यासंदर्भात त्यांच्याविरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच प्रकरणामध्ये मुंबईतील कोर्टाने नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांच्या नावाने हे वॉरंट काढले आहे. त्यानंतर त्यांनी सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. मात्र, त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…